आताशा आठवतो मला,
तो सरुन गेलेला काळ,
जावाब्दारीच्या पडद्या आड
लपून गेलेला काळ.
आताशा आठवतात मला,
त्या डपक्यातल्या होड्या,
आईचं दमून जाण,
वर आमच्या अनंत खोड्या,
आठवतं ते अंगण,
फुला पानांनी बहरलेलं,
"आता मुलं मोठी झली"
म्हणत निपचित विसावलेलं
आठवतात त्या मैत्रिणी,
पैन्जाणांचे, बांगड्यांचे आवाज,
बालपणीच्या सवंगड्यांची,
नव्यानेच ओढ भासते आज,
हलकेच तरळते पाणी,
वाटे यावं परतून ते बालपण.
लहान्गस होऊन पुन्हा,
दणाणून टाकावा तेच अंगण.
शाळा सुटली पाटी फुटली,
म्हणत परत यावं घरी,
पुन्हा डपक साठवायला,
याव्यात धाऊन श्रावणसरी.