गणपती म्हटलं की आठवतात मला ते शाळेतले दिवस..
गणपतीच्या(गणपतीची सुट्टी?

!!!!!!!) सुट्टीतला अभ्यास..
जो कधी एकदा पूर्ण होतो अस वाटायचं..
डोक अभ्यासात अन बाकिच सगळ लक्ष बाप्पाकडे असायचं..
गणपती म्ह्टलं की आठवतात त्या सगळ्या आरत्या..
कोण मोठ्याने म्हण्तय याची स्पर्धा..
धांगडधिंगा..
गणपती म्हणजे मोदक्,लाडू अन् गोडधोड असच काही..
ढोल ताशे अन टाळ...
रात्रिच्या रंगलेल्या गप्पा..
अन पत्त्यांचे फड..
गणपती म्हणजे एक उत्साह नवा..
गणपती म्हणजे एक नवी उमेद एक नवी दिशा..
अन मनाला भावणारं पावित्र्य.....
jay..
