कुणा माहिती कोणता गाव माझा?
उकार कुठे , कुठे अनुस्वार द्यावा,
या प्रवासाचा मी अजाण पामर,
मज जीवनाचा कोण गाईल पोवाडा?
कुणा सांगू कोणते , असे ध्येय माझे,
उनाच्या झळा मज वाटेस जाळे,
तरीही निरंतर मी चालणारा,
जालावीन वाहे, त्या नदीचा किनारा
कधी वाटते जरा शांत व्हावे,
कुठे जायचे, कुणा वाटे पुसावे,
पुन्हा जाणवे मज, मीच तो सीतारा,
दिशा या जगाला, मीच दर्शविणारा
मज साठी वारे न गंधित होते,
न होते कळीचे फुल मजसाठी,
तरीही माझे न कर्तव्य चुकले,
मीच असे त्यांची निगा राखणारा
कुणा माहिती कोणता गाव माझा? उकार कुठे, कुठे अनुस्वार द्यावा …….