बरेच दिवस एखाद्या छोट्याशा प्रसंगा वरून कविता सुचावी अशी इच्छा होती. काल देवानी ती अचानक पुरवली. सकाळी किचनच्या ओट्यावर दिसलेल्या एका छोट्याशा दृश्यावरून अचानक सुचलेली कविता....
बाटलीवर बेनाड्रीलच्या
रांग मुंग्यांची चढली
घेऊन थेंब डोईवरी
वारुळा कडे निघाली.
असेल का आजारी वारूळी
बाळ मुंगीचे तापाने?
लिहून दिले डॉक्टरने
प्रिस्क्रिप्शन बेनाड्रीलचे?
का जमविण्या औषध जमले
केमिस्ट वारुळा मधले
विकतील बेनाड्रील ते
घेऊन साखर दाणे?
केदार....