Author Topic: “शब्दांचं गुद-मरणं”© चारुदत्त अघोर  (Read 863 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं.
“शब्दांचं गुद-मरणं”© चारुदत्त अघोर (३०/८/११)
मला प्रसन्न चित्ती बघायचं असेल,तर मला लिहू दे,
या साचल्या भावनांचं ओझं,शब्द रुपी वाहू दे;
मी नाही बोललो तर, कशी तू त्रास देते,
तुझ्या त्रासापरीच या,साचल्या शब्दांची रास होते;
त्या भावनांना जितकं दाबलं,तेवढी त्यांची भरती येते,
ती ओहोटायाला,शब्द कोरणारी लेखणीच, स्फूर्ती देते;
जेंव्हा ते जमले भाव,एकत्रित होऊन जमाव धरतात,
अशक्य होत गं त्यांना सांभाळणं,असा तणाव करतात;
प्रत्येक भाव वेगळाच मूड घेऊन येतो,जसा मर्जीचा मालक,
हर एकाला न्याय द्यावा लागतो,कारण मीच त्यांचा पालक;
जसा त्यांच्या मागण्यांचा,मनी जमतो घोळका,
शब्द रुपी त्यांना रेखाटलं,कि ओळी विखरतो टोळका;
तुला खरंच कसं कळणार,लेखन म्हणजे,माझं काय आहे,
जसं साचले भाव माझे आपत्य आणि मी त्यांची माय आहे; 
हे कधी येतील मनी,ना खात्री, न वेळ, न काळ आहे,
निघते शब्दच जसे मोती,व ओळ त्यांना गोवली, माळ आहे;
यांना बाहेर नाही काढलं तर जसं,...खाल्ल्या अध-मरणी,हाय असतं,
तुला कसं गं सांगू,साचल्या शब्दांची,….श्वास गुद-मरणी,काय असतं...?!
चारुदत्त अघोर(३०/८/११)





Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):