Author Topic: जुनीच मी...अजुनही तशीच...नवी  (Read 1458 times)

Offline Tinkutinkle

  • Jr. Member
  • **
  • Posts: 58
.
जुनीच कविता पुन्हा नव्याने,
लिहायचा थाट मांडलाय.....
जुनेच तराणे पुन्हा नव्याने,
गुणगुणायला गळा लागलाय.....
,
जुन्याच वाटेकडे पुन्हा एकदा,
पावलांचा मोर्चा वळलाय.....
तीच वळणं घेत-घेत,
पुन्हा त्याच ठिकाणी रस्ता अडलाय.....
,
जुन्याच आठवणी आळवून-आळवून,
मनाने फार दंगा घातलायं.....
म्हणुनच पुन्हा नव्याने,नव्या आठवणी,
जमवायचा चाळा लागलायं.....
,
जुनेच हास्य,जुनाच हुंदका,
पुन्हा एकदा दाटू लागलाय.....
'आज नको,पुन्हा केव्हातरी' म्हणत,
जीव पुन्हा त्यांना टाळू लागलायं.....
,
नवं हवं,नवं हवं म्हणत,
मनाने फारच आग्रह धरलायं.....
सापडलं असता, नव्यातही तो,
जुनंच काहीतरी शोधू लागलायं.....
,
काळीज म्हणाले जुनं बास्स!!
आता त्याला फारंच काळ लोटलायं.....
जुन्या-नव्याच्या हिँदोळ्यावर,
झुलता-झुलता तोही दमलाय.....
,
आयुष्य म्हणाले, अरे वेड्या,
गेला तो काळ आपलाच,
आणि आपलाच आहे जो येऊ घातलाय.....
जुन्या-नव्याचा समतोल ज्याने साधलायं,
खरं आयुष्य तोच जगलाय.....
.
-ट्विँकल

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):