Author Topic: आई..  (Read 1720 times)

Offline pss

  • Newbie
  • *
  • Posts: 3
आई..
« on: September 25, 2011, 01:16:28 AM »
आई.. आई.. आई.. आई.. म्हणजे काय हो..!
आई म्हणजे धरणीवरील स्वर्गरुपी आश्रय हो..

आई म्हणजे नऊ मासांचे गर्भरुपी अंगण..
आई म्हणजे दैवी आकाशाचे वासल्यरुपी चांदण..

आईच्या स्तनपानापरी, सांगा दुसरे अमृत कोणते..
आईच्या मायेविना आश्रीत पोरही पोरके...

आई मुळेच भाग्य लाभले, या विश्वात येणे..
आईचाच हात धरुनी शिकलो विश्वासात चालणे...

आईनेच दिला चिऊमाऊ करुन, अन्नाचा पहिला घास..
आईच होती आजारी लेकराचा चितेंचा ध्यास...

आई कडुनच येतो कधी, सौम्यसा ओरडा..
आई म्हणजे परिजाताचा संरक्षणरुपीसा सडा...

आई म्हणजे असते कधी, उग्र कालीचे रुप..
आईच देते पुत्र चुकीला, शिक्षारुपी स्वरुप...

आई म्हणजे असतो खजिना, उदंड संस्काराचा..
आई म्हणजे असतो प्रेमरुपी, दगड परिसाचा...

आई म्हणजे वेदनेनतंरचा पहिलासा शब्द..
आई म्हणजे वासल्याचा अखंड प्रारब्ध...

आईच असते आजारी लेकराच्या, श्वासाची दवा..
आईच असते संस्कार व लेकरातील, सुंदरसा दुवा...

आई दोन शब्दातच सारे विश्व सामावले आहे..
आईची माया ज्यास नाही तो दुदैवी आहे...

आईचे गोडवे गाण्यासाठी, माझी लेखणीही अपुरी पडेल..
आईचे ऋण फेडण्याकरीता हा जन्मही अपुरा पडेल...

सात जन्म असतील नशीबी तर एकच कर देवा..
जन्मो जन्मी हवी आईची माया, हा एकच माझा हेवा...


                                      प्रसाद सुरावकर ....
« Last Edit: September 25, 2011, 01:23:45 AM by pss »

Marathi Kavita : मराठी कविता