हा वेळ असा तुला ना कळला साचा
किती रोज घासल्या टाचा
किती कुणी कुणी मला फसवले रोज
वाढला डोईवर बोज
हे सरकारा, तुझीही बसली वाचा
किती रोज घासल्या टाचा.............
तू तुझ्याच मस्तीत होता
हा तुला कळला न गुन्ता
खाशील शेवटी गोता
मग पुन्हा तुझे उघडून डोळे काय
हा काळ निघूनिया जाय
मझ कळले रे जिव जातोय ब-याचा
राहिला ना काळ ख-याचा...................................
-------------रोहित_दादा