.
शब्द म्हणजे काय असते?
ओघळणारा झरा असते,
सळसळणारा वारा असते,
शब्द म्हणजे असतो डोँगर,
कधी सुगंधी माती असते.
,
शब्द म्हणजे प्रेम असते
शब्द म्हणजे माफी असते,
शब्द म्हणजे आठवणीँची
भरलेली टाकी असते,
,
शब्द कधी असती सुंदर,
कधी ह्रदयास भीडणारे,
शब्द असती रडता-रडता हसवणारे,
शब्द असती हळूच जग दाखवणारे,
,
शब्द म्हणजे असते ज्ञान,
शब्द म्हणजे असते शान,
शब्दामध्येच मोजले जाते,
तुझ्या-माझ्या अकलेचे परिमाण,
,
शब्द कधी असती प्रेमळ,
शब्द कधी बनती कठोर,
शब्द कधी असती बोलके,
शब्द कधी असती तुटके,
शब्दामध्येच सामावली असतात,
तुझी-माझी सुख-दु:खे,
,
शब्द म्हणजे काय असते?
खरं सांगू?
शब्दांमध्ये दडलेल्या भावनांशिवाय
शब्द म्हणजे काहीच नसते,
आणि हे समजून घे माझ्या मित्रा,
शब्दांविनाही जग असते.
.
-ट्विँकल