माझ्यासाठी कुणीतरी,
एक ओळ जुनीतरी गुणगुणावी,
माझ्या आठवणींची अधीमधी,
धून जरा आळवावी.
नसेल त्याचा श्वास भला,
माझ्या गंधात हरवलेला,
पण असावा तो एकदातरी,
रंगी माझ्या भारावलेला.
सुखात जरी मला कोणी,
विसरले तरी विसरू दे,
दुखात माझी साथ आठवून,
डोळ्यात ओलावा पसरू दे.
जरी कुणाच्या समाधानाकरिता,
आले असेल मरण मला,
याहून नसेल कधीच सोप्पा,
मार्ग जाण्या अमरत्वाला.
---------------- सौम्य