गुत्त्यामुळे संसार जळाला...
दारूची नशा चढली असता
गटारीच पाणीपण तू प्याला,
बाटलीमध्ये संसार साकारून
गुत्त्यामुळे संसार जळाला...
अजब झिंग कशी चढली
दलदलात तू धसत गेला,
बायको-पोरांना वेशीवर टांगून
गुत्त्यामुळे संसार जळाला...
कर्म आणि धर्माची जाण सोडून
जीव तू मेटाकुटीस घालविला,
अश्रुंचे रक्त करीत
गुत्त्यामुळे संसार जळाला...
माय - बापाला ठोकरून
कुठला पराक्रम तू गाजविला ?
आपल्याच आगीत संसार झोकून
गुत्त्यामुळे संसार जळाला...
सिगारेट - विडीच्या धुरासकट
संसार खाक झाला,
आता "अस्ती" सावरून काय फायदा ?
गुत्त्यामुळे संसार जळाला...
: अविनाश सु.शेगोकार
०३-१०-२०११