Author Topic: गगनातूनी चंद्र बरसला, आज अमृत होऊनी....  (Read 803 times)

Offline Tinkutinkle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 58
.
गगनातुनी चंद्र बरसला,
आज अमृत होऊनी,
धरणी सारी तृप्त झाली
आज चंद्र प्रकाशी न्हाऊनी,
,
मला माझाच विसर पडला,
त्यास पाहता या लोचनी,
शहारले, थरारले
आज रोम रोमांतूनी,
,
बेभान होऊन नाचले मी
आज स्तब्ध राहूनी,
हर्षभऱ्‍या नजरेत माझ्या
मग चंद्रही गेला सामावूनी,
,
विलोभनीय हे दृश्य असे,
मनी, अंतरी चमचमले,
नशिबानेच मिळते
अशी अनुभूती,
शब्द मनी उमटून गेले.
.
-ट्विँकल

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...

Offline Tinkutinkle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 58
खुप धन्यवाद......:-)