Author Topic: मी स्वप्नांचा राजा.....  (Read 1224 times)

मी स्वप्नांचा राजा.....
« on: October 15, 2011, 11:03:42 AM »
मी स्वप्नांचा राजा,  माझा मीच तारा
मी वेडा खुळा, माझा मीच भोळा  || धृ ||

     मी आनंदाने हसतो
     मी आनंदाने झुरतो
     मी आनंदाने जगतो
     मी आनंदाने रडतो

मी स्वप्नांचा राजा,  माझा मीच तारा
मी वेडा खुळा, माझा मीच भोळा  || १ ||

     मी कायम हसत असतो
     मी कायम रडत असतो
     मी कायम सुख नि दु:ख
     सोबत ठेवत असतो

मी स्वप्नांचा राजा,  माझा मीच तारा
मी वेडा खुळा, माझा मीच भोळा  || २ ||

     मला सुख म्हणजे माहित नाही
     आणि दु:ख कळत नाही
     मी समाधानावाचून दुसरं
     कधी काहीच शोधलं नाही

मी स्वप्नांचा राजा,  माझा मीच तारा
मी वेडा खुळा, माझा मीच भोळा  || ३ ||

     मी थोडा हट्टी आहे
     मी थोडा खट्याळ आहे
     मी थोडा रागीट आहे
     आणि बराच प्रेमळ आहे

मी स्वप्नांचा राजा,  माझा मीच तारा
मी वेडा खुळा, माझा मीच भोळा  || ४ ||

                            किरण गोकुळ कुंजीर

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: मी स्वप्नांचा राजा.....
« Reply #1 on: October 17, 2011, 12:28:00 PM »
मला सुख म्हणजे माहित नाही
     आणि दु:ख कळत नाही
     मी समाधानावाचून दुसरं
     कधी काहीच शोधलं नाहीsundar vichar......

Offline jagdishkadam

  • Newbie
  • *
  • Posts: 14
Re: मी स्वप्नांचा राजा.....
« Reply #2 on: November 03, 2011, 12:41:29 PM »
sundar vichar......