आपण खरंच इतके एकटे का असतो?
खूप हसताना माणसं हवी असतात सोबतीला
खूप रडावसं वाटताना ती का नकोशी वाटतात मनाला?
हसणं रडणं आयुष्याचाच भाग असताना
आपण असं वेगळ का वागतो?
आपण खरंच इतके एकटे का असतो?
आपल्याला नक्की काय हवं हे माहित असतं प्रत्येकाला
पण ते खरंच योग्य आहे का?, असं का विचारतो दुसऱ्याला?
आपण कसे आहोत हे माहित असताना
दुसऱ्याच्या बोलण्याने मग दु:खी का होतो?
आपण खरंच इतके एकटे का असतो?
आनंदी असताना हि सोबती असतंच ना कोणीतरी
पण लक्ष्यात मात्र राहतो, नैराशेत एकदाच आला असेल कोणी जरी
सहजा सहजी मिळालेल्या प्रेमाची का किंमत नसते कोणाला?
नि आपण नेहमी धावत्याच्याच पाठी का पळत असतो?
आपण खरंच इतके एकटे का असतो?
किरण गोकुळ कुंजीर