(कविता सुचत जाते त्या प्रत्येक टप्प्याचे आणि त्या प्रत्येक टप्प्यावर असलेली मानसिक स्थिती वर्णन करण्याचा एक छोटासा प्रयत्न.
हि कविता मी आत्ता पर्यंत लिहिलेल्या कवितेतली सगळ्यात लहान कविता आहे.)
एखादा विषय
छोटासा प्रसंग
गुणगुण गुणगुण
कल्पनेचे धुमारे
बेचैन बेचैन
शब्दांचा धन्डोळा
अस्वस्थ अस्वस्थ
शेवटी बांधणी
तगमग तगमग
कवितेचा जन्म
शांत शांत
केदार...