हा खेळ बाहुल्यांचा
जग हा खेळ बाहुल्यांचा
दोरी नाचविणा-या विधात्याचा
कोणी न सुटती हातून त्याच्या
हा खेळ आम्ही सगळ्या बघणा-यांचा
तोच हसविता, तोच रडविता,
आम्ही नुसते कर्म करविता
कोणी म्हणे मी श्रीमंत,
कोणी म्हणे मी रंक,
असती त्याच्या पुढे सगळेच सम
आम्ही का हे विसरता,
दोरी असे आपुली त्याच्या हाता
कधी न विसर पडे याचा
दोरी तुटता ज्याची, खेळ संपे त्याचा,
का दुख करी मग या बाहुल्या
जेव्हा जीव नसे आपुल्या हाता
काव्यमन