बहीण सांगे भावाला
बहीण सांगे भावाला
भाऊबीजेचा दिवस हा
काय घालशील ओवाळणीला
नसे कोणती वस्तु मुल्यवान
बहीण तुझ्यापुढे
आई नंतरची माया
जगात तुझीच असे
काय घालू ओवाळणीला
सर्वच फिके तुझ्या प्रेमा पुढे
अश्रूरूपी मोती, आपणहूनच
पडले ताटात तुझ्या
हीच भाऊ बहीणीच्या प्रेमाची
ओवाळणी असे तुला
--काव्यमन