Author Topic: बदल हेच आयुष्य असतं  (Read 1865 times)

Offline Gaurav Patil

  • Jr. Member
  • **
  • Posts: 73
  • Gender: Male
  • अस्तित्वाला हजार नावे देतो... परी नाव ठेववत नाही.....
    • Gaurav's galaxy
बदल हेच आयुष्य असतं
« on: November 05, 2011, 01:15:34 PM »
हारणारे नेहमीच हारत नाहीत...
जिंकणारे नेहमीच जिंकत नाहीत...

हारणारेही कधीकधी असे उडतात,
की पुन्हा जमिनीवर उतरत नाहीत...

आणि जिंकणारे कधीकधी असे आपटतात,
की उडायचे पुन्हा स्वप्नही पाहत नाहीत...

वेळ बदलते...माणसं बदलतात
पण आयुष्य कुणासाठीही थांबत नाही...

बदल हेच आयुष्य असतं हे
बऱ्याच जणांना शेवटपर्यंत कळत नाही...

-   गौरव पाटील

http://gauravspatil.blogspot.com

Marathi Kavita : मराठी कविता