सातच्या आत घरात
आई म्हणते सातच्या आत घरात,
बाबा म्हणतात रमू नको पोरांत,
ह्या वयात नाही अनुभवयाचं
तर परतील का हे दिवस जीवनात
आई बाबांचे दिवस सरले,
ते ते दिवस विसरले
अनुभवांनी का ते एवढे ताठरले,
पंख असूनी का मारू नये भरारी
या गगन विहाराचा आनंद, मग कोणासाठी
कसे समजवू आई-बाबांना,
असे कोणती भीती मनी,
आमचे आम्हांस कळू द्यावे,
आमच्या विश्वासास बळ द्यावे,
संस्कार का तुमचे इतके दुबळे,
वाळूच्या घरा सारखे ढासळे
हे जीवन अनमोल, प्रत्येक क्षणाचा करावा मोल,
भावी जीवनाचे आम्ही ही आई-बाबा,
ही गोष्ट तुमच्या लक्षात का येईना बाबा
-काव्यमन