पाहते स्वप्न आई एकच
असते बाळाबद्दल खरंच
जेव्हा गाते ती अंगाई
वाटते तिला केव्हा मज म्हणेल आई
जेव्हा मारेल आई म्हणुनी हाक
होईल त्या जननीच्या धकधाक
नाही जात, कण पोटात तिच्या
असेल जोवर भुकेला बाळ तिचा
करते ती जो काही विचार
असतो फक्त आपल्या बाळाचा उद्धार
साहोनिया कितीतरी त्रास
केला आपल्या सुखाचा तिने ऱ्हास
अशी हि परोपकारी आई
तिच्यातच शिव, तिच्यातच साई
संध्या [/color][/color]पगारे[/color]