Author Topic: एक शांत मध्यरात्र  (Read 1182 times)

Offline Gyani

 • Newbie
 • *
 • Posts: 18
 • Gender: Male
  • Gyani
एक शांत मध्यरात्र
« on: December 10, 2011, 12:00:56 PM »
एक शांत मध्यरात्र, आकाशात असंख्य तारे
           आणि तुझी आठवण !
त्या शांत निवांत क्षणी, मंद वाऱ्यासह
           मनात तुझी साठवण !!
मस्तकात भेडसावणारे अगणित प्रश्न, उत्तर मात्र
           एकाचेही सापडत नाही !
मनही मग चंचल, उत्तरला सोडून
            तुझ्यामागे धावत राही !!
प्रशांचाही विसर पडावा, असे तुझे भावूक रूप !
स्वतालाही विसरून जाऊन, होतो मग मी एकरूप !!
तुझ्या आठवणी संगे, झुरतो मी, जगतो मी !
तुझ्या आठवणी संगे, झुरतो मी, जगतो मी !
त्या निरव शांततेत मग, स्वर्ग जाणतो मी !!


Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: एक शांत मध्यरात्र
« Reply #1 on: December 16, 2011, 11:42:17 AM »
surekh...