Author Topic: हो मी ठरवलंय...  (Read 1351 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
हो मी ठरवलंय...
« on: December 11, 2011, 10:32:27 PM »
हो मी ठरवलंय...
रोज काहीतरी लिहायचं,
सकाळी दुपारी नाहीतर,
संध्याकाळी तरी लिहायचं...


हो मी ठरवलंय...
प्रत्येक क्षण जगायचं,
हा क्षण गेला तरी...
पुढचा नक्कीच जगायचं.


हो मी ठरवलंय...
भावनेत थोडस गुंतायचं,
वाट कुणाची तरी पहायची
आयुष्यात एकदा तरी गुंतायचं. - हर्षद कुंभार           

Marathi Kavita : मराठी कविता