चल जाऊया....................
जाऊया उंच नभापार.............
उंच मैलावर हजार............
चल जाऊया आकाशात,
चल चंद्राच्या देशात,
फिरू ताऱ्यांच्या वेशात,
तिथून पृथ्वी कशी दिसते ते पाहूया,
कंटाळा आला इथे चल तिथे जाऊया.
पक्षांप्रमाणे गीत पावसाचे गाऊया.
चल जाऊया....................
जाऊया उंच नभापार.............
उंच मैलावर हजार............
फार झाले घोटाळे,
फार झाले scam ,
नाही पृथ्वीवर राहिला नावाला राम.
बदलला देव इथला, बदलला न्याय.
नाही कुणापाशी काही उपाय.
त्यापेक्षा जाऊ शोधू आकाशी देव,
सांगू त्याला कि आम्हा इथेच ठेव.
नको आम्हाला superpowers चा भडका,
नको विमाने , गाड्या , cement च्या सडका,
जातीपातीत देश झाला रे किडका.
त्यापेक्षा त्या तिथे राहूया,
चल जाऊया....................
जाऊया उंच नभापार.............
उंच मैलावर हजार............
इथेच ज्ञानाची वाहिलेली गंगा,
इथेच अज्ञानाने माजवला दंगा,
नारीची धोक्यात अब्रू अन उपाशी पोरं,
राजावाणी फिरती पांढरे चोरं,
त्यांना पाहुनी इथे लाजतात जनावरं,
त्यांचा चारही घोटाळ्यांचा शिकार.
काय चालू इथे सांग कसं रहायचं,
निर्लज्जावाणी सारं कसं पाहायचं.
त्यापेक्षा जाऊया दूर कुठेतरी,
जाऊ नभाकडे जर जागा नसेल या क्षितीवरी.
चल जाऊया दूर कुठे,
रमेना आता जिव हा इथे,
टाकून जाऊ सारे होऊया रिते,
पुन्हा कमवू सारे नव्याने तिथे.
चल अशी जागा शोधूया.
चल जाऊया....................
जाऊया उंच नभापार.............
उंच मैलावर हजार............
................अमोल