कधी कधी..........
कधी कधी खूप खूप जागावं वाटतं
जेंव्हा आपलं कोणीतरी असतं
आपल्याच त्या माणसांसाठी
पाझरणारं ते प्रेम असतं
कधी कधी पडल्यावरही पुन्हा पडावं वाटतं
जेंव्हा हात देणारं कोणीतरी असतं
मदतीच्या त्या हातामधलं
वेगळं असं नातं असतं
कधी कधी खूप दूरपर्यंत चालावं वाटतं
जेंव्हा साथ देणारं कोणीतरी असतं
तिथं वाट संपेपर्यंत साथ देण्याचं
एकमेकांना दिलेलं वचन असतं
कधी कधी त्या स्वप्नातच हरवून जावं वाटतं
जेंव्हा तुझ्यासारखं कोणीतरी असतं
हसता हसता नकळतपणे
'चित्त' चोरून नेणारं असतं.......!