कुणाला ना पटणारा,हा असा माझा स्वभाव आहे…..
ना नाव आहे
ना बनाव आहे
कुणाला ना पटणारा,
हा असा माझा स्वभाव आहे.
मी असतो गर्दीत शांत कधी,
मी नसतो माझ्यातच कधी,
हसणार्यंशी हसतो,
दुसर्यांचा पाय ओढू बघनार्यांवर,
मनातून खरच तरस खातो.
पण ना बोलतो त्याना काही,
ना मी कुणाचे बोलणे एकूण घेतो.
आता दुखेल जरा ही,
असा एक ही ना उरला घाव आहे
कुणाला ना पटणारा,
हा असा माझा स्वभाव आहे.
वाईट वाटत,रस्त्यावरती माझ्या
भाऊ बहिणीना भीक मागाटाना पाहून.
वाईट वाटत देवी सारख्या स्त्री जातीला,
अंग दाखवित, lowest मधे पाहून.
ना मी भीकार्यणा पैसा देतो,
ना आता त्या स्त्री जातीचा मनात मान ठेवतो.
कारण कुणाला बोलणारा ,मी कुणी नाही.
वाटत या पूना मुंबई पैक्षा,
बर माझ अडाणी गाव आहे.
कुणाला ना पटणारा ,
हा असा माझा स्वभाव आहे.
माझ्या गावात स्त्री,
नाव्वारी साडी,जशी एक तेजस्वी देवी,
कपाळावारती कुंकू,
जसे राटरा भर, तारे तिच्या कपाळावारती,
साजायला भंडाळी असावित.
मानाने अगदी मायाळू,
वाटत देवा च्या जागी,
या स्त्री ला मी ओवाळू.
ना मर मर असते कशाची,
ना कसली इरशा असते,
बस मधे म्हातरी चढली,
की १० जन उठून,
तिला बसायला जागा देते.
असो…..
इथे हे कुणाला कळणार नाही,
मागासलेले साही माझे विचार,
पण कदाचित मराठी संस्कृती चे हे नाव आहे.
कुणाला ना पटणारा,
हा असा माझा स्वभाव आहे…..
निशब्द(देव)
कुणाला दुखवायच्या हेतूने मी ही कविता लिहिली नाही आहे,
हे माझे विचार आहेत,चुकीचे असो वा बरोबर,पण मला हे वाटत .