Author Topic: पहिल्या दिवशी फिल्मी दुनियेत  (Read 1293 times)

Offline 8087060021

 • Jr. Member
 • **
 • Posts: 92
 • Gender: Male
पहिल्या दिवशी फिल्मी दुनियेत

जन्माला आला बाळ शाहरुख,
पाळणा हालवी अशोक सराफ
जो बाळा जो जो रे जो जो!!

दुसऱ्या दिवशी आली माधुरी
हसत स्वागत ऐश्वर्या करी
जुहीच्या हातात पाळण्याची दोरी
जो बाळा जो जो रे जो जो!!

तिसऱ्या दिवशी हेमामालिनी
घेऊन आली झबले शिवुनी
लता दीदी छान गायतेय गाणी
जो बाळा जो जो रे जो जो!!

चवथ्या दिवशी रविना आली
बाळाला घाले तब्बू आंघोळी
राणी मुखर्जी आंघोळ घाली
जो बाळा जो जो रे जो जो!!

पाचव्या दिवशी काजोल आली
बाळाला तीट लावू लागली
जयश्री गडकर ने द्रूष्ट काढली
जो बाळा जो जो रे जो जो!!

सहाव्या दिवशी सलमान खान
घेऊन आला रितिक रोशन
पाळणा गातोय अमिताभ बच्चन
जो बाळा जो जो रे जो जो!!

सातव्या दिवशी आला सचिन
शाहरुखची बैट घेला घेऊन
शोएब अख्तर गेला हादरून
जो बाळा जो जो रे जो जो!!

आठव्या दिवशी झालाय वाद
बाळाला भेटायला आले लालूप्रसाद
सोनिया म्हणे मिटवूया वाद
जो बाळा जो जो रे जो जो!!

नवव्या दिवशी आली उषा चव्हाण
गाल गुच्चा बाळाचा गेली घेऊन
प्रीती झिंटाने फुकले कान
जो बाळा जो जो रे जो जो!!

दहाव्या दिवशी आमीर खान
घेऊन आला अजय देवगण
रडवी बाळाला दोघेही जण
जो बाळा जो जो रे जो जो!!

अकराव्या दिवशी गोविंदा आला
म्हणे दादा कोंडके पोटाला आला
फिल्मी दुनियेला आनंद झाला
जो बाळा जो जो रे जो जो!!

बाराव्या दिवशी बारसे झाले
रथी महारथी येऊन गेले
बाळाचे कौतुक करून गेले
जो बाळा जो जो रे जो जो!!

तेराव्या दिवशी बाळ बोलला
गोपा पा पाळणा गाऊ लागला
म्हणे आता लग्नाला चला
जो बाळा जो जो रे जो जो!!

(असेच कुठेतरी ऐकलेले)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
never read this before :D ..........

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):