Author Topic: प्रतीक्षा  (Read 1607 times)

Offline Gyani

  • Newbie
  • *
  • Posts: 18
  • Gender: Male
    • Gyani
प्रतीक्षा
« on: December 27, 2011, 05:18:47 PM »
आयुष्य सगळे उदंड जाहले
दाही दिशी फुले उमलली !
नियतीने मात्र पदरी माझ्या
प्रतीक्षाच ती सोपवली !!

जगणे आता असह्य झाले
सहनशक्तीची सीमा आली !
प्राणाला या जपता जपता
मनाची पूर्ण फसगत झाली !!

कोण कोठला काळ म्हणे तो
औषध असतो जखमेवरती !
तत्वांना या सारून बाजू
काळच येथे घाव घालिती !!

आनंदाच्या अफाट जन्मी
ह्या डोळ्यांनी वाट पाहतो !
हळूच हासते स्वप्नी मग ती
स्वप्नांना मी हि जपतो !!

स्वप्नी माझ्या रोज दिसे ती
आयुष्यात अवतरली !
अगणित आनंदाने माझी
प्रतिक्षेची वाट संपली !!
-
ज्ञानेश कुलकर्णी
« Last Edit: December 27, 2011, 05:19:19 PM by Gyani »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline utkarsh

  • Newbie
  • *
  • Posts: 23
Re: प्रतीक्षा
« Reply #1 on: December 27, 2011, 05:51:42 PM »
chan..

adwita

  • Guest
Re: प्रतीक्षा
« Reply #2 on: January 04, 2012, 01:17:43 PM »
 :)

adwita

  • Guest
Re: प्रतीक्षा
« Reply #3 on: January 04, 2012, 01:18:15 PM »
  :)

Umesh Tambe

  • Guest
Re: प्रतीक्षा
« Reply #4 on: January 09, 2012, 08:55:08 AM »
 छान आहे ‍कविता मित्रा...........

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: प्रतीक्षा
« Reply #5 on: January 09, 2012, 03:30:56 PM »
khup chan....