Author Topic: आज ना आठवांत माझ्या.....  (Read 711 times)

Offline janki.das

  • Jr. Member
  • **
  • Posts: 76
आज ना आठवांत माझ्या.....
« on: December 28, 2011, 12:33:12 AM »


मी न शब्दात माझ्या
मी न बोलात माझ्या
म्हणती श्वास ज्यास
तोही न कह्यात माझ्या !

ग्रीष्मातल्या ऊनासाठी
क्षण ओले मी वेचिलेले
कोरडे का जाहले सारे
ओंजळ-स्पर्शाने माझ्या !

अनुकूल न पडले फासे
पटावरती आयुष्याच्या
जिंकूनही "तो एक डाव"
जिंकण्यात का हार माझ्या !

छबी हसरी दावूनी दु:खा
फसविते मी रोज तयांना
वाट थोपविल्या अश्रूंची
जाते या मनातून माझ्या !

सोहळे माझ्या सुखांचे
सजले होते कधीकाळी
मोसम तो मी जगलेला
आज ना आठवांत माझ्या !

@ प्रीत @

Marathi Kavita : मराठी कविता