Author Topic: मागणे हेची ईश्वरा  (Read 1168 times)

Offline Gyani

 • Newbie
 • *
 • Posts: 18
 • Gender: Male
  • Gyani
मागणे हेची ईश्वरा
« on: January 01, 2012, 01:14:58 PM »
रम्य सकाळी आकाशी, विहरति पक्ष्यांचे थवे !
सर्वाना समृद्धी देवो,येणारे हे वर्ष नवे !!

काट्याच्या रस्त्यावर चालून,रक्ताळले ज्यांचे तळवे !
नववर्षात भरून येतील,काळजीचे कारण नसावे !!

चुका जाहल्या ज्या गतवर्षी,ध्यानी मनी त्या असाव्यात !
संकटांचा सामना करण्या,त्या मार्गदर्शक ठराव्यात !!

नववर्षाला नवीन जीवन, नवी मिळू द्या तुम्हा शक्ती !
घायाळ झालो जरी कधी,अखंड असावी ध्येयासक्ती !!

थोरांचे हि  स्मरण ठेवा, नववर्षी या आज तुम्ही !
मराठी अस्मिता जपून ठेवा,जाणतो मराठी आम्ही !!

नववर्षात अगणित आनंद, येऊ द्या तुमच्या घरा !
सर्वाना विवेक द्यावा, मागणे हेची ईश्वरा !!!!!!

-  ज्ञानेश कुलकर्णी

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: मागणे हेची ईश्वरा
« Reply #1 on: January 02, 2012, 01:16:39 PM »
nav varshachi khup chan kavita.....

Offline balrambhosle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
Re: मागणे हेची ईश्वरा
« Reply #2 on: January 06, 2012, 10:26:10 PM »
chaan............