Author Topic: काय अडलंय....  (Read 961 times)

Offline rudra

  • Full Member
  • ***
  • Posts: 879
  • Gender: Male
  • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
    • My kavita / charolya
काय अडलंय....
« on: January 04, 2012, 02:42:52 PM »
काय अडलंय ती सोबत नसेल तर...
आजही तू तोच आहेस,
जो काल  होतास.
काय झालं तुला रडताना कुणी पाहिलं तर...
आजही तेच सहन करतोयस,
जे काल करत होतास.
काय झालं तिने तुला विचारलं नाही तर...
आजही तू तिच्यावर प्रेम करतोस,
जे काल करत होतास.
अरे,.. हरकत नाही तिने मन मोडलय तर...
आजही तू स्वभिमानी आहेस,
जो तू काल होतास.
वेड्या,.. तिच्याविना काय जग थांबलंय...
आजही तुझे विचार तरुण आहेत, 
जसे ते काल होते.
                                             
                                                    -रुद्र

Marathi Kavita : मराठी कविता