Author Topic: कर्मयोगी  (Read 803 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
कर्मयोगी
« on: January 06, 2012, 12:51:55 PM »
 
 (कविता मोठी झाली आहे. पण सर्व घटनाक्रम   लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.  यात कोणाच्याही भवना दुखावण्याचा हेतू नाही.) 
कलियुगी महाराष्ट्र देशी
आहे गांव राळेगणसिद्धी
करण्या उद्धार त्या गावासी
अवतरला निष्काम कर्मयोगी

राहून निरीछ आणि सोज्वळ
केले कष्ट त्याने अपार
करुनी प्रबोधन केले गाव
स्वयं:सिद्ध, आदर्श, व्यसनमुक्त

भारत देशी पसरली ख्याती
गावकर्यांच्या सोज्वळतेची
गावाच्या व्यसन मुक्तीची
तंटारहित आदर्श गावाची

गावकरी सोज्वळ, चारित्र्यवान
नाही कसलेही त्यांना व्यसन
मानती योग्यास गावचा देव
म्हणती प्रेमाने “अण्णा” त्यांस

मूर्ती जरी लहान त्यांची
कीर्ती परी महान त्यांची
उपोषणाचे अस्त्र हाती
करण्या सेवा समाजाची

गल्ली पासून दिल्ली पर्यंत
मंत्र्या  पासून मुख्य मंत्र्या पर्यंत
प्रधान मंत्री अन सर्व पक्ष
मान देती अण्णाच्या शब्दांस


झाले गावचे अण्णा आदर्श
परी राहिले प्रसिध्धी पराड
सोडला न त्यांनी गाव
गर्वाचे त्यांना  न ठावे नाव

परी अचानक एके दिवशी
भेटले त्यांना केजरीवाल, बेदी
ओळखून वृत्ती भोळी अण्णांची
म्हणे सापडला गडी लढण्यासी

गर्दी खेचण्या हाच बरा
बनवू आता यालाच मोहरा
उपोषणासी  बसवू याला
बनवून आपण "टीम अण्णा"

दावून स्वप्न स्वछ भारताचे
म्हणे करू आयोजन लढ्याचे
आम्ही मेंबर "टीम अण्णा" चे
उगारा तुम्ही शस्त्र उपोषणाचे

म्हणे मिटवू भ्रष्टाचार
आणून विधेयक लोकपाल
पाडू सरकार संसदेत
संसदेवर बसवू लोकपाल

भोळे अण्णा फशी पडले
सोडून गाव दिल्लीत गेले
रामलीला मैदानात बसले
उपोषणाचे अस्त्र उपसले

जमला जनसमुदाय अपार
दिल्लीत उडाला हाहाकार
"टीम अण्णा" चे झाले नाव
केजरीवाल, बेदी बनले महान

घेऊन वचन अण्णा परतले
वार्ताहर नेते गावात जमले
टाइम मासिकी अण्णा झळकले
नाव अण्णांचे जगात गेले

केजरीवाल, बेदी कंपनीस परी
सुटली होती हाव प्रसीध्धीची
भिगडली प्रकृती बसवले तरी
मुंबईत अण्णास उपोषणासी

म्हणे धरू उपोषण आम्हीही
बसू अण्णाच्या बरोबरीनी
परी बघुनी प्रतिसाद कमी
झाले अदृश्य केजरीवाल, बेदी

पंतप्रधान विनविती फोन करुनी
लढा अण्णा उपोषण सोडूनी
दोरीस हो ताणणे अति
ना ते होय फलदायी

अण्णा बिचारे एकटे पडले
तळमळती सगळे गावाकडे
संसदेतही राजकारण चाले
लोकपालाडून सरकार पाडणे

नेण्या अमुल्य ठेवा आपुला
आले गावकरी मुंबापुरीला
घेऊन गेले भोळ्या अण्णांना
जणू अक्रूर नेई कृष्णाला

आता ना उरली "टीम अण्णा"
केजरीवाल हि न दिसती आता
बेदी तरी केव्हाच पळाल्या
लोकपाल हि  चर्चेत फसला

सोडा अण्णा केजरीवाल, बेदी
"टीम अण्णा" ची करा बरखास्ती
दाखवली दिशा तुम्ही लढ्याची
मार्गदर्शन करा आता तरुणांसी

अण्णा गरज तुमची गावात
राबवा राळेगण इतर गावात
महाराष्ट्र वसतो गावागावात
गावे सुधारता सुधरेल भारत

काय साधेल  येता लोकपाल
नाही जर तुम्हीच रहाल
गरज तुमची अण्णा देशास
अमुल्य ठेवा तुम्ही आम्हासकेदार....
 

Marathi Kavita : मराठी कविता

कर्मयोगी
« on: January 06, 2012, 12:51:55 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline balrambhosle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
Re: कर्मयोगी
« Reply #1 on: January 06, 2012, 10:27:59 PM »
ekdum barober..ahe......sir !!!!!!!!!!!!

Offline amoul

 • Full Member
 • ***
 • Posts: 654
 • Gender: Male
 • tAKE iT eASY
Re: कर्मयोगी
« Reply #2 on: January 26, 2012, 12:39:51 AM »
kavita chhanach  ahe....... tumachya sarakhi.....
tumachya visesh ashya rachana prakaratila kavita khup aavadtata

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):