Author Topic: टीम अण्णा  (Read 833 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
टीम अण्णा
« on: January 09, 2012, 04:06:15 PM »
एक बाबा कुठून येतो
योगासनाचे धडे देतो
योगायोगाने प्रसिध्द होतो
बाबा रामदेव नाव सांगतो

एक स्वामी कुठून येतो
भगवी कफनी धारण करतो
"बिग बॉस" मध्ये प्रवेश करतो
स्वामी अग्निवेश नाव सांगतो

एक अधिकारी कुठून येतो
नोकरी सोडून आंदोलन करतो
संसदेचीही जिरवीन म्हणतो
केजरीवाल नाव सांगतो

एक आय.ए. एस. कुठून येते
तिहार जेल बदलून टाकते
रामलीलेवर नक्कल करते
किरण बेदी नाव सांगते

जमता अशी चांडाळ चौकडी
कसे होईल आंदोलन यशस्वी
करा आता "टीम अण्णा" ची
अण्णा तुम्हीच बरखास्ती.केदार...

Marathi Kavita : मराठी कविता