Author Topic: बोलायाचे कितीक आहे पण....  (Read 1674 times)

Offline killedar

  • Newbie
  • *
  • Posts: 8
बोलायाचे कितीक आहे पण....
« on: January 11, 2012, 06:52:16 PM »
माझ्यापाशी सुरेख वारा आणि भोवती अक्षरधारा
बोलायाचे कितीक आहे पण ओठातुन झिरपत नाही

फुरफुरणारे बाहू माझे प्रचंड शक्ती आणि उसासे
तोडायाचे बंधन जे जे आवेशातुन उतरत नाही

थरथरणार्‍या स्वरात माझ्या कंपुन उठतिल भाव-भावना
स्वच्छंदी गाण्यात परंतू तान मोकळी येतच नाही

दहा दिशांच्या रिंगणातुनि क्षितीज सुद्धा उल्लंघिन मी
एकवटाया सारे बळ परि मनगट ते सरसावत नाही

रंग उषेचे हातामधुनि उधळित जाईन पानोपानी
घेतो मी कुंचला तसा अन् विचार तेव्हा रंगत नाही

मी वेडा आनंदासाठी धुंद मोकळ्या श्वासासाठी
मन्मनात जे आता आहे अंतरातुनि बरसत नाही

उगाच फिरतो पृथ्वीवरती शोधित जातो उजाड नाती
मी माझ्याशी ठेऊन नाते माझ्याशीही बोलत नाही

-- Unknown

Marathi Kavita : मराठी कविता


Offline jagdishkadam

  • Newbie
  • *
  • Posts: 14
Re: बोलायाचे कितीक आहे पण....
« Reply #1 on: January 23, 2012, 11:14:53 AM »
hi