Author Topic: आई  (Read 1478 times)

Offline salunke.monika

  • Newbie
  • *
  • Posts: 38
आई
« on: January 15, 2012, 08:52:09 PM »
आई तुझी खूप आठवण येते आहे............
बालपणीचा तुझा चिऊचा घास
माझ्या झोपेत गुंतलेले तुझे श्वास
माझी काळजीच जणू तुझा ध्यास
हृदयी स्पंदने बघ कशी वाढते आहे
आई तुझी खूप आठवण येते आहे.......
माझ्या चुकेवर तुझे पांघरून घालणे
बाबांच्या रागावर तूच आवर घालणे
माझ्या जखमांवर तुझ्या मायेचे मलम लावणे
तुझ्यासाठी मन कासावीस होते आहे
आई तुझी खूप आठवण येते आहे............
अक्षरे गिरवण्यास तूच शिकवली
शब्द आणि भावनांची घडी तूच बसवली
दैवी आराधना या मुखातून तूच वदवली
तुझ्यासाठी डोळ्यांमध्ये आसवांची गर्दी होते आहे
आई तुझी खूप आठवण येते आहे..........
शाळेतील किस्से आधी तुलाच सांगणे
कॉलेजातील गमती सांगतांना तुला मैत्रीण बनवणे
आजही तुझाच आदर्श आणि माझे शब्दांशी खेळणे
शब्दांबरोबर भावनाही तुझाच शोध घेत आहे
आई तुझी खूप आठवण येते आहे........संदिप

Marathi Kavita : मराठी कविता


SUNIL M KURADE

  • Guest
Re: आई
« Reply #1 on: January 16, 2012, 09:56:46 AM »
 :)KUPAC CHAN ......MAST