Author Topic: हिरकणी..........  (Read 1175 times)

हिरकणी..........
« on: January 16, 2012, 11:09:54 AM »
ऑफिस मेल box  मध्ये मराठी Email चुकुनच दिसतात...
otherwise बाकीचे मात्र ढिगाने असतात...
आज एक मराठमोळा असाच जागा झाला...
आणि त्याने हिरकणीचा किस्सा share  केला...

का कुणास ठाऊक तो mail मी २-३ वेळा वाचला...
delete न करता तसाच Archive केला...
बाळासाठी अंधारात गड उतरणारी हिरकणी काही केल्या डोळ्यासमोरून जाईना...
आणि माझ्यातली आई मला तो किस्सा विसरुही देईना....

हिरकणी सारखी नसले तरी मीही एक आईच आहे...
उंच आकाशी उडणारी घार पण चित्त मात्र पिलापाशी आहे....
रोज सकाळी बाहेर पडताना दरवाजा बंद होईपर्यंत पिलाकडे पाहते आहे....
आणि संध्याकाळ कधी होईल याच विचारात घर सोडते आहे.....

दिवसभरात १० वेळा बाळाला mobile वर पहायचं..
photos आणि videos यावरच समाधान मानायचं...
जमलंच तर घरी एखादा phone करून पिलाचा आवाज ऐकायचा...
आणि मायेने फुटलेला पान्हा जगापासून लपवायचा....

घड्याळाच्या काट्याकडे पाहतच काम करायचं दुसरीकडे लक्षही द्यायचं नाही...
Pending कामाच्या यादीत बाळाच्या खाउची वेळही विसरायची नाही..
संध्याकाळी जाताना गाडीच स्पीड कधी वाढत कळत नाही...
आणि traffic  ला मागे सारत रस्ता कधी सरला कळत नाही....

सगळ्यांनी विचारव.. कस जमत हे तुला...?
तान्ह्या बाळाला अस घरी सोडून यायला...?
चेहऱ्यावर माझ्या एकच Smile  असते त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला..
आणि आत हिरकणीच काळीज आसुसलेल.. बाळाला कुशीत घ्यायला..

का हे सगळ....? कशासाठी...? कधी वाटत सोडून द्याव सगळ काही...
फक्त बाळाची आई व्हाव बाकी नकोच काही....
पण....
खर तर आई आहे म्हणूनच रोज हे धाडस करते आहे ...
माझ्या पिलाच्या  भाविश्यासाठीच...हि आई रोज हिरकणी बनते आहे....

- Shailja...

After your replies to Chandobach Prem-Patra.... here is a new one.... :)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline amoul

  • Full Member
  • ***
  • Posts: 654
  • Gender: Male
  • tAKE iT eASY
Re: हिरकणी..........
« Reply #1 on: January 26, 2012, 12:33:26 AM »
khup bhavali kavita.........