Author Topic: मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.  (Read 1772 times)

Offline Nitesh Hodabe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 166
  • Gender: Male
  • नितेश होडबे
    • My Photography, My Passion
   
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय...

नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
मधली सुट्टी होताच वॉटरबॅग सोडुन

नळाखाली हात धरून पाणी प्यायचय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या
चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

उद्या पाऊस पडुन शाळेला सुट्टी मिळेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

कितीहि जड असु दे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराचं ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऑफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्या वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा
दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.