Author Topic: कविता केली मी ही अशीच जाता जाता.....  (Read 809 times)

Offline vishakha beke

 • Newbie
 • *
 • Posts: 32
कविता केली मी ही
अशीच जाता जाता.....

कागद होता एकटा
म्हणतो खुणावून मला
आता तरी कर कविता
जाता जाता .........

मी म्हंटले कागदाला 
सुचेल जेंव्हा मला काही
तेंव्हा लिहीते तुझ्यावर काही
जाता जाता ..........

पण बघता पेना कडे , राहवेना मला
म्हणून उचलून पेन
लिहीले कागदावर असेच काही
जाता  जाता..........

तरी पण कवितेला
वाक्य काही जमेना
म्हणून उचलले शब्द
आणि जोडले एकमेकांना
जाता  जाता ...........

ह्या जोडलेल्या शब्दांचा
अर्थ काही उमगेना
कळला जर तुम्हाला अर्थ
तर मलाही सांगा
जाता  जाता ..............

!!!!!!  विशाखा बेके !!!!!!!!!   

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
तुमच्या कवितेला उत्तर देतोय....   
 
जोडलेल्या ह्या शब्दांचा
अर्थ न जरी कळला
वाटले असे जणू
वाचली छान कविता
जाता जाता....     
 
केदार....
« Last Edit: February 03, 2012, 03:25:38 PM by केदार मेहेंदळे »

Offline vishakha beke

 • Newbie
 • *
 • Posts: 32
dhanyavaad  mehendale  sir  ,  mastach  ans  aahe  tumche ...

dile  ans  tumhi
vaachale tehi mi
aavadale mala te
jata jata.........