Author Topic: किती वर्णन करू त्या सुंदर कोकणाचं  (Read 1074 times)

Offline vishakha beke

 • Newbie
 • *
 • Posts: 32
निसर्गाच्या कुशीत
वसले आहे कोकण
रूप त्याचे देखणे
भारावून टाकी मन

... कधी डोंगरांतून ,
धबधबा कोसळे
तर कधी नारळाच्या झाडींतून ,
सूर्याचा किरण डोकावून जाई

कोकणात जाता , येता
निसर्गही रूप बदलत राही
आत्ता दिसे डोंगरातले झरे
तर क्षणात दिसे विशाल समुद्र

आह आह काय ते रूप गोजिरे
आणि देखणे त्या अथांग सागराचे
जेवढे बघावे तेवढे
डोळ्यात साठवणे अवघड असे

तो अफाट समुद्र
म्हणजे आहे एक हिरा
त्याच्या रक्षणासाठी उभ्या
आहेत नारळीच्या झाडांच्या रांगा

ह्या सगळ्यांच्या पोटात
धावत असते झुकझुक गाडी
धडक धडक करत
पळत सुटते सुसाट ती

किती वर्णन करू त्या सुंदर कोकणाचं
किती वर्णन करू त्या सुंदर कोकणाचं 
शब्द थांबले आणि म्हणाले
" आम्हालाही सामावून जावूदेत
ह्या विशाल कोकणात "

" आम्हालाही सामावून जावूदेत
ह्या विशाल कोकणात "
--------- विशाखा बेके ---------
 

 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
pan hi shrungarik kavita aahe ka?

Offline vishakha beke

 • Newbie
 • *
 • Posts: 32
nasel  tar  sorry  but  mala  aase  vaatale , mhanun  me  hya  section  madhye  send  keli  kavita , chukale  aasel  tar  sorry  sir  ,  maaf  karaave