Author Topic: चिमुकल्याच जग...  (Read 870 times)

चिमुकल्याच जग...
« on: March 02, 2012, 05:22:13 PM »
चिमुकल्याच जग खूपच निराळ..
सगळ्यांसारखच पण तरीही सगळ्यांपेक्षा वेगळ
इवलस पाखरू दिवसभर धाउन धाउन दमत
आणि संध्याकाळी आईच्या कुशीत जाउन वीसावत
रात्री चिमुकल्या डोळ्यात चिमुकली स्वप्न साठलेली
सांडू नयेत म्हणून पापण्यांची दार मिटलेली...
चिमुकल्याच्या जगात बाबाच मेन हिरो असतात..
आणि मित्राचे बाबा व्हिलन च काम करतात...
आई सारखी सुंदर जगात दुसरी कोणीच नसते...
तिच्या कडे अगदी सगळ्याच चुकाना माफी असते...
आजी सारख्या गोष्टी पुस्तकाला सुद्धा सांगता येत नाही....
आजोबांची छडी त्याच्याशिवाय कोणाला होता येत नाही....
चिमुकल्याच्या जगात आकाशाला सुद्धा हात लागतो...
एका ठोशात डोंगर सुद्धा चूर चूर होऊ शकतो...
चिमुकल्याच्या जगात सूख दूख काहीच नसत...
फक्त निखळ आनंद आणि निरागस प्रेम असत....
चिमुकल्याच्या जगात भविष्य नावाचा काळच नाही..
भूतकाळच भूत तिथे चुकुन सुद्धा फिरका नाही....
चिमुकल्याच्या जगात देव बाप्पा सगळ ऐकतो..
हसतो... बोलतो... आपल्याला हव ते सगळ सगळ देतो....
चिमुकल्याच्या या सुंदर जगात पोटभर खाउ, सगळ्यांच प्रेम आणि रात्रीची शांत झोप असते...
रोजची सकाळ नव्याने येते आणि आयुष्यातला सुगंध उधळून जाते..

चिमुकल्या या जगात मलाही कधीतरी जावस वाटतय...
जगायच विसरलोय कुठेतरी.... पुन्हा आता जगावास वाटतय......

-- शैलजा

Marathi Kavita : मराठी कविता