Author Topic: कॉलेज चे दिवस  (Read 1641 times)

Offline किशोर देशमुख

  • Newbie
  • *
  • Posts: 17
  • Gender: Male
    • Blog...
कॉलेज चे दिवस
« on: March 10, 2012, 11:17:41 PM »
कॉलेज चे दिवस आठवले कि अस वाटत कि पुन्हा ते दिवस परत यावेत
ती कॉलेज मधली मस्ती, तो कॅन्टीन मधला चहा, अन सार काही मित्रांबरोबर share करन
आणि ते दिवस आठवले कि आठवतात ते सारे enjoyment चे क्षण ………….
 
कॉलेज मध्ये लेक्चर साठी कुठे कुणाला जायचं असत
पोरींना पाहण्यासाठी ते एक चांगल reason असत
 
पोरगी आली नाही म्हणून रुसून कशाला  बसायचं
madam कडे पाहून नुसताच शांत बसायचं
 
ती आपल्याकडे पाहते म्हणून आपणही तिच्याकडे पाहायचं
अन ती पाहत नाही म्हणून मग आपण मुकाड्यान बसायचं
 
ते एवढसं 5Star चार जणांनी share करन
आपल्या प्रत्तेक मित्राला केव्हाही मदद करन
कॉलेज च्या कट्ट्यावर टवाळक्या करन
अन impression पडावं म्हणून वाट्टेल ते करन
 
आली आता sessional नाव लिहून मोकळ व्हायचं
अन दुसऱ्याच दिवशी स्वतःच नाव Hit List वर पाहायचं
 
आता मला अभ्यास करायचा हे मत ठाम करायचं
अन Notes हातामध्ये घेऊन पोरींकडे तिरप्या नजरेन पाहायचं
 
सगळ्या मुलींना खरच propose मारून टाकायचा
नाही म्हटल तर काय झाल प्रयत्न सुरु ठेवायचा
 
सगळ्यांना propose मारल्यावर एकच उत्तर होत
अन आपल सगळ काम सार one sided च होत
 
Enjoy करता करता final year चा शेवटचा दिवस आला
अन शेवटच्या दिवशी साऱ्या आठवणी जमा झाल्या
………………
 किशोर देशमुख....
« Last Edit: March 10, 2012, 11:18:38 PM by किशोर देशमुख »

Marathi Kavita : मराठी कविता