Author Topic: माझी गाणी: लावणी -धो धो पावसात  (Read 592 times)

Offline prasad26

  • Jr. Member
  • **
  • Posts: 103
काळ काळ ढग जमल निळ्या आभाळात
इजा कडाडल्या गरजले मेघ
पावसाने बाई धरला जोर ओढे खळखळ वाहिती
एकली मी बाई रानात झाले चिंब ओलेती
थरथरू लागले अंग अन भीती भरली नयनात
नाही कुणाची साथ मला ह्या धो धो पावसात
नाही कुणाची साथ मला ह्या धो धो पावसात

कोरस 1 : अहो नाही कुणाची साथ हिला ह्या धो धो पावसात
कुणी जा हिच्या गावा, धाडा सांगावा हिच्या हो रावा
नसे हा कावा , नाही कांगावा लवकरी राया हिचा हो यावा

किती वेळ अशी उभी राहू मी आंब्याखाली एकली
आजच नेमकी नाही आली सोबतीला सहेली
थकले माझे डोळे पाहुनी सखयाची ग वाट
नाही कुणाची साथ मला ह्या धो धो पावसात
कोरस 1

शोषला माझा कंठ, राया तुला मारू किती हाक
मावळतीला दिसू लागली आता रातची झाक
उजळू लागली मनात काळोखाच्या भीतीची वात
नाही कुणाची साथ मला ह्या धो धो पावसात
कोरस 1

मंद सुंगंध कुठूनी आला दरवळला ग चाफा
गवताच्या सळसळीतूनी वाजाती घोड्यांच्या टापा
सुटले ग मी बाई , सख्याची स्वारी भरली नयनात
नाही कुणाची साथ मला ह्या धो धो पावसात
कोरस 1

अलगद बसवील मला संगती त्याने  उमद्या घोड्यावर
अन तो हि चालू लागला टपाटपा गावाच्या वाटेवर
ओली प्रीत आज दौडली ग ओल्या हिरव्या रानात
मिळाली रायाची मज साथ ह्या धो धो पावसात

कोरस२:  रायाची मिळाली साथ हिला ह्या धो धो पावसात
           
----प्रसाद शुक्ल

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
wa..... rav... lai bhari