Author Topic: माझी गाणी: एक सुंदर भेट  (Read 813 times)

Offline prasad26

  • Jr. Member
  • **
  • Posts: 103
माझी गाणी: एक सुंदर भेट
« on: March 15, 2012, 03:09:27 PM »

आमच्या पहिल्या बाळाची चाहूल बायको कडून जेंव्हा समजली - तेंव्हा सुचलेली हि कविता

तुला मी देणार आहे रे
एक सुंदर भेट
हृदयाशी तू धरशील सखया
अनेक चुंबने घेत

गुलाब कालिके परी ती मोहक
लाख हिर्‍यांहूनी ती रे मौलिक
पुढील स्वप्नांची ती प्रेरक
सांगितल्या विन  तू रे ओळख
गोड गुपित आहे ते माझे
सांगू कसे तुज थेट
तुला मी देणार आहे रे
एक सुंदर भेट

लाडे लाडे म्हणोनी साजणी
केली होती मज जवळी मागणी
ओढुनी परी लज्जेची ओढणी
अबोल राहिले मी त्या क्षणी
अजुनी जरा धीर धर रे
लवकरीच तुझ्या हाती आहे देत
हृदयाशी तू धरशील सखया
अनेक चुंबने घेत
---प्रसाद शुक्ल

Marathi Kavita : मराठी कविता