Author Topic: माझी गाणी: अंगाई - नीज  (Read 713 times)

Offline prasad26

 • Jr. Member
 • **
 • Posts: 103
माझी गाणी: अंगाई - नीज
« on: March 15, 2012, 04:59:25 PM »
माझ्या चिमुकल्या कन्येसाठी --आणि हो नंतर माझ्या चिमुकल्या चिरंजीवास हि म्हणत असे

चांदण्यांचा थवा बाई जमला ग गगनात
नीज लाडके तू आता किती हाससी गालात

सकाळीच येई दारी चिवचिव करी जी चिमणी
घरट्यात गेली ती ग मिटे डोळ्यांची पापणी
घेई पिलाल्या आपल्या उबदार ती पंखात
नीज लाडके तू आता किती हाससी गालात

दिसभर बागडूनी मनीमाऊ ती दमली
कोपऱ्यात जाऊनीया अंग चोरून निजली
मावशी ग ती वाघाची राहतो जो वनात
नीज लाडके तू आता किती हाससी गालात

झुलावती ग फुलांना वेलीवरची ती पाने
नभातून चंद्र त्यांना गाई अंगाईचे गाणे
गवताच्या पात्यावारी वारा नाचतो तालात
नीज लाडके तू आता किती हाससी गालात

इवल्या इवल्या डोळ्यातुनी पुरे पाहणे ते आता
अजून तू जागी कशी जग सारे झोपी जाता
रमुनी तू जाई बाई गोड सुंदर स्वप्नात
नीज लाडके तू आता किती हाससी गालात


---प्रसाद शुक्ल

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: माझी गाणी: अंगाई - नीज
« Reply #1 on: March 16, 2012, 11:11:12 AM »
mala khatri aahe jenwha jenwha tumhi hi angai wachal tenvha tenvha tumhala tumchya balala kadewar/ mandiwar ghetlyacha bhas hoil...... khup chan.

Offline prasad26

 • Jr. Member
 • **
 • Posts: 103
Re: माझी गाणी: अंगाई - नीज
« Reply #2 on: March 16, 2012, 02:09:00 PM »
केदार - हो अगदी बरोबर --thanks

काही कवितांचा जन्म कल्पनेतून होतो
काही कविता आपण अनुभवलेल्या असतो
तो अनुभव स्वतःचा असेल किंवा भोवतालचा
असेल उद्याचा किंवा आजचा वा तो कालचा

काही कविता आपण जगलेल्या असतो
जगण्यातून कविता सुचते
कवितेतून जगणे रुचते
आणि अशी जगलेली कविता
नेहमीच मनात घर करून राहते

I thank you again for making me to write these lines