Author Topic: सचिन  (Read 766 times)

Offline Gyani

  • Newbie
  • *
  • Posts: 18
  • Gender: Male
    • Gyani
सचिन
« on: March 17, 2012, 05:15:09 PM »


क्रिकेटच्या खेळत अनेक येतात, अनेक जातात, काही खेळतात नवीन
|
पण क्रिकेट म्हणजे एकच नाव ते म्हणजे
[/b][/size]सचिन

देशोदेशी त्याची कीर्ती,मैदानी तो उभा ठाई |

 बौलर्स ना तो स्वप्नी दिसे,होतसे त्यांची धुलाई
||

 निश्चयाचा महामेरू,क्रिकेटचा खरा चाहता
|
 गर्वाचा लवलेश नसे, खेळाचा तो राजा जाणता
||

 मैदानी तो उतरताची, रेकॉर्ड होई प्रत्येक वेळी
|
 उभा देश उदंड जाहला पाहून त्याची अनोखी खेळी
||

 क्रिकेट जगती मान त्याचा, समस्तांच्या गळ्यातला तो ताईत
|
 जग हे त्याचा आदर्श ठेवी,गोडवे त्याचे गाईत
||

 शब्द हि त्यास अपुरे पडती,खेळां समवेत त्याच्या गाठी
|
 मी हि पामर काय लिहावे त्याच्या कौतुकासाठी
||

 शतकांची शतके झाली सहस्त्रो   झाल्या त्याच्या धावा
|
 खेळाडूंना अभिमान त्याचा, सोबती मात्र तोच हवा
||

 क्रिकेट साठी आत्मा  त्याचा,सहज त्याने वाहिला
||
 काय सांगू लोकहो, मैदानी मी देव पाहीला................
...................मैदानी मी देव पाहीला.....................

-
 ज्ञानेश कुलकर्णी

Marathi Kavita : मराठी कविता