Author Topic: माझी गाणी : आरती -रेणुकेची  (Read 561 times)

Offline prasad26

  • Jr. Member
  • **
  • Posts: 103
आमची कुलदेवता -रेणुका (माहूर) . शिवरायांच्या जन्मभूमी जुन्नर येथे देवीचे देऊळ आहे - ग्रामदैवत!  तेथील आम्ही पुजारी. माझ्या कडे एक जुने दस्तऐवज आहे - अर्धे मोडी लिपी मध्ये आहे व अर्धे पर्शियन भाषेत - जे मी बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्याकडून वाचून घेतले.  १५५० साल चे आहे. त्यात आम्हाला बादशहाने ( during Moghul rule) जुन्नर व  आसपास च्या गावांचे पौरोहित्य करण्याचे अधिकार दिले असा मजकूर आहे.
माझा जन्म रेणुका देवीला नवस केल्याने झाला म्हणून माझे नाव प्रसाद. त्या आमच्या कुलदेवीची - रेणुकेची ही आरती.

( चाल पारंपारिक -- जय जगदीश हरे --)

जय जय रेणुके माते जय जय रेणुके
शरण मी तुझ्या चरणी, आशीर्वाद दे
जय जय रेणुके

तुझ्या रूपे लक्ष्मी, पाहतो सरस्वती
आकार तूच दे ग , आधार तूच दे ग माझ्या जीवनी
जय जय रेणुके

पुण्याचे होवोत पर्वत, पाप विलीन धरणी
तन मन धन ग माझे लागो सत-करणी
जय जय रेणुके

विसर न व्हावा तुझा मजला हीच बुद्धी देई
तुझे नाम सदा मुखी हीच इच्छा हृदयी
जय जय रेणुके

लाभो मज आरोग्य सम्पती हीच विनंती
करितो ग प्रसादे, परशुराम जननी
जय जय रेणुके

--प्रसाद ( उर्फ परशुराम) शुक्ल