Author Topic: माझी गाणी :पाळणा -२  (Read 2669 times)

Offline prasad26

  • Jr. Member
  • **
  • Posts: 103
माझी गाणी :पाळणा -२
« on: March 22, 2012, 03:21:04 PM »
पाळणा -२ -- आमच्या चिरंजीवांच्या बारशाच्या वेळेस -

( चाल -- भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण 
                चित्रपट - श्यामची आई )

हलकेच जोजवा ग सयांनो पाळणा
पाळण्यात ठेवियला नवा पाहुणा
 
श्रावण ग मास तो, शुद्ध नवमी
पहाटेचा समय ग  तो चंद्र गगनी
सुखावली माउली ती पुत्र दर्शना
पाळण्यात ठेवियला नवा पाहुणा
 
अरुंधती बहिण ह्याची शोभे भाग्याची
पाठीवरी हिच्या मारा थाप कुंकाची
ताई म्हणविता मनी हर्ष मावेना
पाळण्यात ठेवियला नवा पाहुणा
 
दीपाच्या उदरी पहिली जन्मते ज्योती
ज्योती मागुनी किरण येई संगती
अनिरुद्ध हाचि किरण शुक्ल सदना
पाळण्यात ठेवियला नवा पाहुणा
 
सोनियाचा दिन हा, उगवला आज
पाळण्यासी चढविला सुमनांचा साज
आप्त-इष्ट जमले ह्या नामकरणा
पाळण्यात ठेवियला नवा पाहुणा
 
--प्रसाद शुक्ल

Marathi Kavita : मराठी कविता