Author Topic: कविता... माझी / मी कवितेचा......  (Read 598 times)

Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
कविता... माझी / मी कवितेचा......

ती मनात रुंजी घालत, ती आसपासशी दिसते
कधी येते सहज जवळ ती, कधी रुसल्यावाणी होते

कधी शब्दांसोबत येते, कधी शब्दांना घाबरते
कधी गळ्यात घाली हात, कधी दूर दूरशी असते

कधी नृत्य मनोरम दावी स्वच्छंदे विहार करते
हुरहूर जीवा कधी लावी विरहिणी आर्त आळवते

ही स्वयंवरातील मुग्धा कशी निवड कुणाची करते
ही कुणास घालील माळ कविलाही कधी ना कळते

माझ्यावर करते प्रीती का, मी तिजवर प्रीती करतो
हे कोडे तसेच ठेऊन भाव मात्र अलगद जपतो...


- shashaank purandare.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: कविता... माझी / मी कवितेचा......
« Reply #1 on: April 16, 2012, 11:57:23 AM »
khup chan..... kavita he ek adhbhut aahe.

deeepaalee

 • Guest
khaasach aahe.

Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
Thanks to all of you.........