Author Topic: कवितेची एक ओळ  (Read 566 times)

Offline Dr.Vinay Kalikar

  • Newbie
  • *
  • Posts: 31
कवितेची एक ओळ
« on: April 18, 2012, 08:34:12 PM »

कवितेची एक ओळमिळे ना मिळे ना

ए मना शोधना

शिंपल्यात,तळाशी तुझ्या

निळ्यात ,नभाशी तुझ्या

कप्प्या कप्प्यात तुझ्या

कवितेची एक ओळ …डोंगर माथ्यावरी

कडे -कपारीतुनी

वाऱ्याच्या झोक्यावारी

निर्झर झऱ्यातुनी

पानाफुलातुनहि न मिळे

कवितेची एक ओळ …विचार ,माहेरवाशिणीला

वादळातील घायाळ तरुला

विरहात फिरणाऱ्या धरेला

कवितेची एक ओळ …कुठेच नाही मिळणार

शोधून नाही सापडणार

अशीच नाही गवसणार

कवितेची एक ओळ …छेडता मनाची तार

करेल हृदय एल्गार

नव्या कल्पनेलाच मिळणार

कवितेची एक ओळ. …__विनय काळीकर --

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: कवितेची एक ओळ
« Reply #1 on: April 23, 2012, 12:53:18 PM »
sundar...