Author Topic: अपूर्ण..?  (Read 553 times)

Offline vaibhav joshi

  • Newbie
  • *
  • Posts: 37
  • Gender: Male
  • भावनांचा भार पेलतात ते शब्द..!
अपूर्ण..?
« on: April 21, 2012, 01:02:25 PM »

मनात प्रचंड घालमेल चालली आहे

क्षणोक्षणी ती वेगाने वाढत आहे

प्रगती खुंटली आहे

मनही अस्थिर आहे

हळूहळू 'चितेवर'  'अनुस्वार' फोफावतो आहे

भविष्यापासून अनभिज्ञ मी वाटचालीपासून दुरावतो आहे

थोरांचे अनुभव ऐकले आहेत

'उणीवेचे' दोष अभ्यासले आहेत

का मग उगाच डोळ्यांसमोर एक प्रश्नचिन्ह आहे...

खरच का मी अपूर्ण आहे...?

 --- वैभव वसंत जोशी, अकोला

Marathi Kavita : मराठी कविता