Author Topic: सांग प्रिये काय हवंय तुला?  (Read 666 times)

सांग प्रिये मला, आज बर्थडे गिफ्ट काय  हवंय तुला
कॉलेज  मध्ये असतांना..पौकेट मनी अपुरा म्हणून तुला कधी काही घेतला नाही
आणि आता नोकरीचा पगार माझा मलाच पुरत नाही...
पण या वेळी ठरवलंय.. काहीतरी गिफ्ट द्यायचं तुला..
सांग आज काय हवंय तुला?

चंद्र आणि तारे तोडून आणायला मला जमनार  नाही.
आणि तिकडे टूर वर जायला आपल्याला परवडणार नाही
पण
तुझा चंद्र मी आणि तूच माझी चांदणी सांगू सगळ्या जगाला
सांग आणखी काय हवंय तुला?

दागिन्यांची हौस तुझी मला चांगलीच ठाऊक आहे
सोने-हिरे सोड ग, इथे चांदीचाही भाव गडगडला आहे
सिम्पल आणि स्वीट तू अशीच आवडतेस मला. म्हणूनच
आज नुसताच गजरा आणलाय तुझ्या केसात माळायला
सांग आणखी काय हवंय तुला?

भारीतली लिपस्टिक आणि भारीतला ड्रेस हवाय कशाला?
मला पाहून तुझ्या गालावर चढलेली लालीच सजवते तुला..
म्हणून डेनिम ची जीन्स नाही पण हि जरीची साडी आणली आहे...
तुला आज साडीतच या सजलेली पहायचंय मला.
सांग आणखी काय हवंय तुला??

तुझे सगळे हट्ट खरच पुरवायचेत मला
तुझ्या सगळ्या इच्छा , अपेक्षा आणि स्वप्न सत्यात उतारवायच्यात मला
त्यासाठीच हे सगळ करतोय. थोडासा वेळ देशील का मला?
आयुष्यातला प्रत्येक क्षण तुझाच आहे
तूच श्वास आणि तुझाच ध्यास...
तुझ्यावर विश्वास आणि तूच आधार...
माझे सगळे सर्वस्वच अर्पण केलय तुला
सांग सखे आज बर्थडे गिफ्ट म्हणून आणखी काय हवंय तुला...??